लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत निवडणुकीत आपला उमेदवार निवडून यावा यासाठी काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे नवस देवाला करतात. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत अश्याच एका अवलियाने नवस केला होता. व उमेदवार निवडून आल्यानंतर पुणे – सोलापूर महामार्ग ते कदमवस्ती येथील गणपती मंदिरापर्यंत “दंडवत” घालीत दोघांनी हा नवस फेडला आहे. याबाबत पूर्व हवेलीसह सोशल मिडीयात या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे.
कदमवाकवस्ती गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष विकास अशोक कदम व लोणी काळभोर येथील योगेश विलास काळभोर अशी “दंडवत” घालीत नवस फेडलेल्या दोघांची नावे आहेत.
विकास अशोक कदम यांनी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या “सरपंच” पदी चित्तरंजन गायकवाड यांची सरपंचपदी निवड व्हावी तसेच त्यांच्या प्रभागातील उभे असलेले तीन उमेदवार निवडून यावे, यासाठी कदमवस्ती येथे असलेल्या मंदिरापर्यंत दंडवत घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चित्तरंजन गायकवाड व त्यांच्या प्रभागातील तिन्ही उमेदवार हे मोठ्या फरकाने निवडून आल्याने विकास कदम व योगेश काळभोर यांनी पुणे – सोलापूर महामार्गापासून ते गणपती मंदिरापर्यंत ५०० मीटर अंतर हे “दंडवत” घालून पूर्ण केले.
दरम्यान, चित्तरंजन गायकवाड व त्यांचे सहकारी मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर त्यांनी “दंडवत” घालण्यास सुरूवात केली. यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी पॅनेलच्या घोषणा देत त्यांना प्रोत्साहान दिले.
यावेळी रस्त्यावर थांबून अनेकजण “दंडवत” कशासाठी घालत आहेत, याची विचारपूस करत होते. काही वेळातच ते दंडवत घालत गणपती मंदिरात पोहोचले व देवाचे दर्शन घेतले. व त्यांनी दंडवत कशासाठी घातले यांचे उत्तर उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले. विकास कदम व योगेश काळभोर यांनी घातलेल्या दंडवताच्या व्हिडिओची सध्या पूर्व हवेलीसह सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.