लहू चव्हाण
पांचगणी – सातारा जिल्ह्यातील कारी गावचे सुपूत्र व पांचगणी पोलीस ठाणे येथील सहाय्यक फौजदार अरविंद माने यांना नुकतेच पदोन्नती आदेश प्राप्त झाले आहे. ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून संबोधले जाणार असून, याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अरविंद माने हे सातारा जिल्ह्यातील कारी गावचे सुपुत्र असून सातारा पोलीस दलात एसआरपी ग्रुप २ मधून भरती झाले आहेत त्यानंतर त्यांनी १९८८ ते २००६ पर्यंत नवी दिल्ली ,चंद्रपूर ,यवतमाळ गोंदिया, गडचिरोली, गोवा , आंध्र प्रदेश, भंडारा, मुंबई या ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यानंतर २००६ साली सातारा जिल्हा पोलिस मुख्यालय येथे ३ वर्ष , मेढा येथे ६ वर्ष आणि पांचगणी येथे ७ वर्षे सेवा बजावली असून सध्या ते पांचगणी पोलीस ठाण्यात सहायक फौजदार म्हणून कार्यरत आहेत.
निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना तरी दोन स्टार लावण्याची आस बाळगून असलेल्या पोलीस जवानांना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील ६४ सहाय्यक उपनिरीक्षकांना नुकताच पोलीस उपायुक्त श्रेणी दर्जा मिळाला आहे.
पोलीस दलात तीस वर्ष सेवा पूर्ण केलेल्या तसेच सहाय्यक फौजदार पदावर किमान तीन वर्ष सेवा झालेल्या उपनिरीक्षक संवर्गाची वेतनश्रेणी घेत असलेल्या जिल्ह्यातील ६४ सहाय्यक फौजदाररांना आता उपनिरीक्षक संबोधण्यात येणार आहे. यामध्ये पांचगणीतील माने यांचा समावेश आहे.या बढती बद्दल माने यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यापूर्वी चिपळूण व सावर्डे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काहीकाळ वाहतूक शाखेत काम केले. ४० वर्ष पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष अधिकारी कार्यरत असून पोलीस महासंचालक पोलीस पदक देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग, ठाणे शहर अशा अनेक जिल्ह्यात त्यांनी यापूर्वी काम केले आहे.
घरफोडी, खून,चोऱ्या व अन्य विविध गुन्ह्याच्या तपासात त्याची उल्लेखनीय कामगिरी पोलीस दप्तरी केली असून त्यांच्या या कामाची पोचपावती म्हूणनच त्यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. त्याच्या या नियुक्तीबद्दल सावर्डे परिसरात अभिनंदन होत आहे.