Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुढील सुनावणी ८ ऑगस्टला ; शिंदे गट – शिवसेना यांच्या याचिकेवरच्या चिन्हाबाबतचा निर्णय निवडणुक आयोगाने कोर्टाच्या निर्णयानंतरच घ्यावा – सर्वोच्च न्यायालय…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 August 2022, 12:34

मुंबई : शिंदे गट – शिवसेना यांच्या याचिकेवरच्या चिन्हाबाबतचा निर्णय निवडणुक आयोगाने कोर्टाच्या निर्णयानंतरच घ्यावा. असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच शिवसेना नेमकी ठाकरेंची की शिंदे गटाची, या प्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी पूर्ण झाली. म्हणून उर्वरित सुनावणी सोमवारी ८ ऑगस्टला होणार आहे. असेही न्यायालयाने सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटाला आपली बाजू मांडण्याकरता काल (बुधवारी) वेळ दिला होता. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे बुधवारी सुनावणी झाली. शिवसेनेतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे, महेश जेठमलानी आणि नीरज कौल यांनी, तर राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बाजू मांडली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आज काय निर्देश देतात, याकडे आज साऱ्यांचे लक्ष आहे

उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला की, बंडखोर गटाने व्हिपचे उल्लंघन केल्याने घटनेतील दहाव्या परिशिष्टानुसार, ते अपात्र ठरतात. तसेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार, त्यांनी इतर पक्षात विलीन होणे बंधनकारक आहे. शिंदे गटाला पक्षाच्या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.

मात्र ते सूरत आणि गुवाहटीला गेले. त्यांनी स्वतःचा विधीमंडळ नेता निवडला. म्हणजेच त्यांनी पक्ष सदस्यत्व सोडले. त्यामुळे ते आता ओरिजनल शिवसेनेवर दावा ठोकू शकत नाहीत. दहाव्या परिशिष्टानुसार त्यांना कायद्यानुसार ही परवानगी मिळू शकत नाही.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्यांनी पक्षांतर बंदी कायद्यानुसार, दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे. हाच एक पर्याय असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. तर आम्ही पक्ष सोडलाच नसल्याने पक्षांतर बंदी कायदा आम्हाला लागूच होत नसल्याचा युक्तिवाद हरिश साळवे यांनी केला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने  या याचिकांवरील सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे. आज ४ ऑगस्ट रोजी कोर्टाच्या पटलावर पहिल्याच क्रमांकावर ही याचिका सुनावणीसाठी घेतली जाईल, असे न्यायमूर्तींनी जाहीर केले

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32

ST Bus News : कुंजीरवाडीकरांचा एसटी थांब्यासाठी एल्गार; प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी

Friday, 8 May 2026, 17:00
Next Post

पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अरविंद माने यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.