Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरसह जिल्ह्यातील 26 गावांमध्ये लाचखोरीला आळा घालण्यासाठी आता ‘अँटी करप्शन ब्युरो’ आपल्या दारी!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 10 October 2025, 11:52

लोणी काळभोर : लाचखोरीला आळा घालण्यासाठी आता अँटी करप्शन ब्युरो आता लोणी काळभोरसह जिल्ह्यातील 26 गावांना भेटी देणार आहे. 13 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या चार दिवसाच्या कालावधीत अँटी करप्शन कायद्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. यावेळी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली आहे.

जर कोणताही अधिकारी किंवा मध्यस्थ व्यक्ती तुमच्याकडे लाचेची मागणी करत असेल, तर आता तुम्हाला तक्रार देण्यासाठी पुण्यात एसीबी कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण आता अँटी करप्शन ब्युरोच तुमच्या दारी येत आहे. या विशेष जनजागृती कार्यक्रमादरम्यान, एसीबीचे अधिकारी त्यांच्या पथकासह खाली दिलेल्या तारखांना तालुक्याच्या शासकीय गेस्ट हाऊसमध्ये उपस्थित राहतील. अधिकारी परिसरातील समाजसेवक, अशासकीय संस्थांचे पदाधिकारी तसेच एसीबीकडे यापूर्वी तक्रार केलेल्या नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या तक्रारी व समस्या ऐकून घेतील. असे सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी असे परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

सासवड, जेजुरी व नीरा या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती मोरे, वडगाव मावळ व लोणावळा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक निता मिसाळ तर खेड व चाकण येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वाळके हे या गावांना सोमवारी (ता.13) भेटी देणार आहेत. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.14) बारामती, मोरगाव येथे पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे, वाघोली, शिक्रापूर व शिरूर येथे पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे तर आळेफाटा, जुन्नर, नारायणगाव व मंचर येथे पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर उपस्थित राहणार आहेत.

 

दरम्यान, भिगवण व इंदापुर येथे पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे, लोणी काळभोर, दौंड व यवत येथे खंडेराय रंजवे तर भोर, राजगड, वेल्हा येथे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे हे या गावांना बुधवारी (ता.15) भेट देणार आहेत. तर चौथ्या दिवशी शुक्रवारी (ता.26) पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर हे पिरंगुट व पौड येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व अधिकारी नागरिकांच्या तक्रारी घेऊन त्वरित सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच यावेळी नागरिकांना अँटी करप्शन कायद्याबाबत जनजागृती करणार आहेत.

कोणताही लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी एजंट तुमचे शासकीय काम करण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास, एसीबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने तक्रार दाखल करावी. अन्यथा अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक-020-26122134, 26132802, 26050423 व संपर्क साधावा. तसेच व्हॉट्स अॅप क्रमांक 9403781064 यावरही आपली तक्रार नोंदवू शकता. तुमची तक्रार जागेवरच स्वीकारली जाईल आणि त्वरित पुढील कार्यवाही सुरू केली जाईल?

शिरीष सरदेशपांडे (पोलीस अधीक्षक – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तुमची गाडी किती जुनी आहे? केंद्र सरकार आणतंय ‘PUCC 3.0’; जाणून घ्या आता गाडीच्या नियमात काय बदलणार

Tuesday, 23 June 2026, 22:53

पुण्यात लुटेरी दुल्हनचा कारनामा! तरुणाला जाळ्यात ओढलं, बनावट विवाह रचला अन् घरी परतताना फरार…

Tuesday, 23 June 2026, 22:31

पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा दणका! 15 गंभीर गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार एटीएसच्या जाळ्यात

Tuesday, 23 June 2026, 21:38

नागपूरची कमान आता नांगरे पाटलांच्या हाती! 14 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न

Tuesday, 23 June 2026, 20:51

सोने सांगवीत सिमेंट वाहतूक करणारा ट्रक भिंतीवर आदळला,सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Tuesday, 23 June 2026, 20:46

उरुळी कांचन येथे दुचाकी गाडीच्या डिक्कीतून भरदिवसा 81 हजार रुपये पळवले; उरुळी कांचन पोलिसांचा फिर्यादीला ‘लोणीकंद’ला जाण्याचा सल्ला..

Tuesday, 23 June 2026, 20:19
Next Post

भावकीतील वादातून डोक्यात कोयत्याने वार; एकाच कुटुंबातील अनेक जखमी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.