उरुळी कांचन, (पुणे) : सहकारी संस्था मुळातच चालतात त्या संचालक मंडळाच्या त्यागावर, सभासदांच्या विश्वासावर, कर्जदारांच्या नैतिकतेवर आणि कर्मचा-यांच्या मेहनतीवर. “सहकार्यातून समृदधी ”हे ब्रीद्र वाक्याप्रमाणे आज आपली पतसंस्था जनमानसात रूजली, वाढली असे प्रतिपादन उरुळी कांचन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास भन्साळी यांनी केले.
उरुळी कांचन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उरुळी कांचन येथे नुकतीच पार पडली. यावेळी देविदास भन्साळी बोलत होते.
यावेळी उरुळी कांचनचे सरपंच अमित (बाबा) कांचन, संस्थेचे उपाध्यक्ष जयप्रकाश बेदरे, सचिव अशोक सावंत, खजिनदार मिलिंद जगताप, संचालक आबासाहेब टिळेकर, शिवाजी कांचन, सर्व संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, सभासद वर्ग, माऊली कांचन, प्रा. के. डी. कांचन, राजाराम कांचन, राजेंद्र टिळेकर, योगिनी कांचन, उपस्थित होते.
यापुढे बोलताना भन्साळी म्हणाले, “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ”या सहकारी चळवळीमधील मुळमंत्राचा अर्थ समजुन घेत संस्थेची आज 36 व्या वर्षात यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे.
दरम्यान, इयत्ता 10 व 12 वी मधील शालेय व सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेला सतत ऑडिट वर्ग ‘अ’ असून सातत्याने एनपीएओ असून सभासदांना सन 2024 साठी 14 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. प्रास्ताविक मिलिंद जगताप यांनी केले व सर्वांचे आभार अशोक सावंत यांनी मानले. अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक हरिदास भन्साळी यांनी केले.