Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 पावसाचे पाणी अंगावर उडाल्याचा रागातून एस.टी. चालकाला दुचाकीस्वाराकडून मारहाण; बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावरील प्रकार, सरकारी कामात अडथळ्याप्रकरणी गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 20 August 2025, 13:28

सोलापूर: रस्त्यावरील पावसाचे पाणी अंगावर उडाल्याच्या रागातून दुचाकी चालकाने महामंडळाच्या एस.टी. बस चालकाची गचांडी धरून प्रवाशांसमोरच बेदम मारहाण करून धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावरील श्रीप्रसाद हॉटेलच्या बाजुला असलेल्या टाटा शोरूमच्या समोर मंगळवारी (ता. 19) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारूती महादेव काटकर (वय -37, धंदा, नोकरी, एस.टी. बस चालक, रा. जामगाव (पा) ता. बार्शी जि. सोलापूर, सध्या नेम बार्शी आगार, जि – सोलापूर), असे मारहाण झालेल्या एसटी चालकाचे नाव आहे. तर सचिन सुभाष शिंदे (रा. नाईकवाडी प्लॉट, उपळाई रोड, बार्शी ता. बार्शी) असे मारहाण करणाऱ्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मारूती महादेव काटकर यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारूती काटकर हे बार्शी एसटी आगारात मागील तेरा वर्षापासून चालक म्हणून कार्यरत असून चालक क्र. 61130 असा आहे. मंगळवारी दुपारी आगारातून बार्शी ते उपळाई (ठोंगे) या गावाकडे एसटी बस घेऊन निघाले होते. यावेळी काटकर व वाहक नितीन नलवडे हे प्रवाश्यांसह निघाले होते. आगारातून कुर्डूवाडी रोड मार्गे उपळाई (ठोंगे) येथे जात असताना कुर्डूवाडी रस्त्याचे काम सुरु आहे. तसेच सतत पाऊस चालु असल्याने रस्त्यावर पाणी साचुन चिखल झाला होता.

यावेळी एसटी बस चालवत असताना चालक बाजुने एक इसम मोटार सायकलवरून निघाला होता. यावेळी त्याच्या अंगावर रस्त्यावरील खड्ड्यातील साचलेले पाणी उडाले. त्यामुळे दुचाकी स्वाराने त्याची मोटार सायकल एस. टीच्या पुढे घेऊन थांबविली. दुचाकी थांबवल्याने एसटी बस चालक काटकर यांनी एस.टी बस रस्त्याच्या बाजूला घेतली. दुचाकीस्वार हा एस.टी बसच्या केबिनजवळ आला व त्याने केबिनचा दरवाजा उघडुन काटकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व शर्टाला धरून केबीनच्या खाली ओढले.

दरम्यान, खाली ओढल्यानंतर त्याने माझ्या सरकारी गणवेशाच्या शर्टाचा डावा खिसा धरून ओढुन फाडला व तसेच ओढत मला वाहकाकडील दरवाज्याकडे नेऊन पायरीवर पाडले व प्रवाश्याच्या तसेच वाहकासमोर शिवीगाळ करून हाताने लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच तु येथुन एस.टी कसा घेऊन जातो अशी धमकी देऊन तो तेथुन काहीवेळाने निघुन गेला.

दरम्यान, चालक व प्रवाशांच्या मद्यस्थीनंतर मोटारसायकलस्वार तेथून काही वेळाने निघून गेला. चौकशीअंती त्याची ओळख सचिन शिंदे अशी पटली आहे. याप्रकरणी काटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सचिन शिंदे याच्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार कांतीलाल लाड करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Gunfire erupts in the air over business dispute! Thrilling shooting in broad daylight in Patus; 8 people in police custody

व्यवसायाच्या वादातून हवेत गोळीबार! पाटसमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 5 June 2026, 19:24

जागतिक संकटातही भारताची प्रगती! GDP वाढीचा दर 7.7 टक्क्यांवर

Friday, 5 June 2026, 19:09
Next Post

बीडमध्ये सरकारी वकिलाने कोर्टातच गळफास लावून केली आत्महत्या, न्यायालयाच्या खिडकीला दोरी बांधली...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.