लोणीकंद : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली (ता. हवेली) बाजारतळ परिसरात गावठी हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या सराईताला लोणीकंद पोलिसांनी १ वर्षासाठी जिल्ह्यातुन तडीपार केले आहे.
सागर ऊर्फ दादा विश्वास लोंढे, (वय-२६, रा. दुबेनगर बालाजी पार्क, लेन नं. ०६ वाघोली ता. हवेली) असे तडीपार केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०४, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे जिल्ह्यातुन ०१ वर्षाकरीता तडीपार केले आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली बाजारतळ भागात तयार गावठी हातभट्टीची दारु विक्री करुन सदर भागात राहणारे नागरीक तसेच प्रतिष्ठित नागरीकांना वारंवार त्रास देवुन त्यांचेवर दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणा-या सराईत गुन्हेगारांच्या कृत्यामुळे लोकांच्या मनात कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता.
सदर सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सागर लोंढे याच्यावर सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी सदर सराईत टोळीप्रमुख व त्याचे साथीदार इसम यांचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसमांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांना प्रस्ताव पाठविला असता, रोहिदास पवार यांनी सदर सराईतास पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन एक वर्षाकरीता तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु, अमोल भोसले, विजय आवाळे, कुणाल सरडे, बापु जाधव यांनी केली आहे.