बापू मुळीक
सासवड: पिंपळे (ता पुरंदर) येथील उपसरपंच शरद शिवरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, रिक्त झालेल्या जागेवर अमोल पोमण यांचा एकमेव अर्ज आल्याने, सरपंच गौरी गोफणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये उपसरपंच म्हणून, अमोल सुदाम पोमण यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे सरपंच गौरी गोफणे यांनी जाहीर केले.
यावेळी माजी सरपंच उज्वला पोमण, माजी उपसरपंच शरद शिवरकर, विलास चव्हाण, सुभाष पोमण, चंद्रकांत पोमण, रामदास पोमण, शांताराम पोमण, विलास पोमण, विद्या खेनट, सारिका दाते, आप्पासो खेनट, मीनाक्षी पोमण, संतोष गोफणे, दिगंबर पोमण, वैभव पोमण, ग्रामसेवक शरद बिनावडे आदी उपस्थित होते.
सर्व गावातील जेष्ठ पदाधिकारी, सरपंच, यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या कार्यकालामध्ये शासनाच्या असणाऱ्या, विविध शासकीय योजना, सामान्य शेतकऱ्यापर्यंत, महिलांपर्यंत, युवक पिढी, विद्यार्थी यांच्या व गावच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे नूतन उपसरपंच अमोल पोमण यांनी सांगितले.