राजू देवडे
Ambegaon News : लोणी धामणी : शिरदाळे (ता. आंबेगाव) हे गाव बटाटा पिकाचे आगार समजले जाते. मात्र, गेली काही वर्षांपासून या परिसरात बटाटा लागवडीचे प्रमाण घटले आहे. दिवसेंदिवस पावसाचे घटते प्रमाण, बाजारभावाची अनिश्चितता, मजुरांचा वाढलेला खर्च या सर्व बाबींमुळे बटाटा पीक घेणे महागडे झाल्याचे शिरदाळे येथील बटाटा उत्पादक शेतकरी निवृत्ती मिंडे, बाबाजी चौधरी, कांताराम तांबे, राघू रणपिसे, संभाजी सरडे या शेतकऱ्यांनी सांगितले.
कोरड्यात केलेली बटाटा लागवड, त्यानंतर दोन महिने पावसाने फिरवलेली पाठ, पुन्हा अंतिम टप्प्यात झालेला अतिपाऊस आणि या सर्व संकटातून वाचलेल्या थोड्याफार पिकाला बाजारभावाने दिलेला फटका, यामुळे पिकाचे भांडवल देखील वसूल झालेले नाही. (Ambegaon News) बटाटा पीकामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्वरित नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शिरदाळे येथील सरपंच जयश्री तांबे, उपसरपंच बिपीन चौधरी, सरपंच मनोज तांबे, उपसरपंच मयूर सरडे, गणेश तांबे यांनी केली आहे.
सुरवातीपासूनच कमी पाऊस असल्यामुळे कमी उत्पन्न तसेच दहा किलोला १०० ते १२० रुपये असा मातीमोल भाव यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. (Ambegaon News) शासनाने पंचनामे केले असले, तरी बटाटा लागवड खातेधारकांना सरसकट मदत मिळावी, अशी मागणी शिरदाळे येथील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
शिरदाळे येथे प्रकल्प उभारावा
शिरदाळे म्हटले की ‘बटाटा’ अशी ओळख झाली होती; परंतु निसर्गाचा अनिश्चितपणा, बाजारभावापेक्षा खर्च जास्त व उत्पन्न कमी, मजूर न मिळणे किंवा मिळाले तरी त्यांच्यावर भरमसाठ खर्च यामुळे शेती करणे खूप अवघड झाले आहे. या परिसरात एखादा प्रकल्प उभारल्यास शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या हातभार मिळेल. (Ambegaon News) शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी.
– मयुर सरडे, उपसरपंच, शिरदाळे
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ambegaon News : वडगावपीर-मांदळेवाडी गावांसाठी दोन एसटी बस सुरु