राजू देवडे
Ambegaon News : लोणी धामणी : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथे बिरोबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंतच्या कालावधीत भागवताचार्य गणेश महाराज शिंदे (उदापूर, जुन्नर) यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.
बिरोबा मंदिरात दसरा उत्साहात साजरा
नवरात्रोत्सव काळात भागवत महात्म्य, व्यास चरित्र, शुक्रदेवतांचा जन्म, जडभरत कथा, आजमीळ आख्यान, गजेंद्र आख्यान, श्रीकृष्ण जन्म, रास क्रीडा, कंस वध आदी कथा सांगण्यात आल्या. (Ambegaon News) गणेश महाराज शिंदे यांनी कथेच्या काळात कन्या दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. कन्या दिन हे कथेचे आकर्षण ठरले.
विजयादशमीच्या दिवशी गंगचे पाणी, पाण्याची मिरवणूक, श्रींची महाआरती, काठीची मिरवणूक, संध्याकाळी बिरोबाचे पुजारी गणपत मंचरे यांच्या हस्ते बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. रात्री आठ नंतर शिवपुत्र संभाजी महानाट्य फेम होम मिनिस्टर निलेश पडवळ यांचा ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम झाला. (Ambegaon News) घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत भाविकांना दररोज संध्याकाळी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन बिरोबा नवरात्र मंडळाने केले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ambegaon News : धामणी ग्रामस्थांनी दिला ॲड. अविनाश रहाणे यांच्या स्मृतींना उजाळा
Ambegaon News : वडगावपीर येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण