राजू देवडे
Ambegaon News : लोणी धामणी : धामणी (ता. आंबेगाव) येथे शिवसेना पुणे जिल्हा संघटक, सहसंपर्क प्रमुख, माजी जिल्हाप्रमुख स्व. ॲड. अविनाश रहाणे यांच्या स्मृतीपित्यर्थ शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी धामणी ग्रामस्थांकडून रहाणे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
धामणी ग्रामस्थांकडून रहाणे यांच्या स्मृतींना उजाळा
धामणी ग्रामस्थांचे रहाणे यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. अविनाश रहाणे यांनी वेळोवेळी धामणीतील कार्यकर्त्यांना ताकद द्यायचा प्रयत्न केला. (Ambegaon News ) त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी तालुक्याचे नेतृत्व केले. आज धामणी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीसमोर पंचांच्या पारावर अविनाश रहाणे यांच्या स्मृतीपित्यर्थ शोकसभआ झाली. सुरुवातीला ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते रहाणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी बोलताना पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनी सांगितले की, मी अगदी लहानपणापासून अविनाश रहाणे यांच्यासोबत सावलीसारखा राहिलो. (Ambegaon News ) तालुक्यांमध्ये रहाणे यांच्या माध्यमातून मला वेगवेगळया पदांवर काम करण्याची संधी मिळाली. आज मी जो काही आहे, त्यामध्ये रहणे यांचा मोलाचा व सिंहाचा वाटा आहे. हिंदू ह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला गेले असता रहाणे यांनी करून दिलेली ओळख व अनेक प्रसंग त्यांनी सांगितले.
ॲड. विठ्ठलराव जाधव यांनी सांगितले की, मी आणि अविनाश रहाणे यांनी पत्रकारिता व वकिली सोबत केली आहे. रहाणे साहेबांसोबत घडलेल्या अनेक प्रसंगांची त्यांनी आठवण करुन दिली. (Ambegaon News ) धामणी गावात युती शासनाच्या काळात तत्कालीन मंत्री लिलाधर डाके, शाबीरभाई शेख, पालकमंत्री प्रमोद नवलकर अशा अनेकांना गावामध्ये आणता आले. या सर्वांमध्ये मोलाचा वाटा स्व. रहाणे यांचा आहे.
या वेळी सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, माजी सरपंच अंकुश भूमकर, माजी सरपंच सुनिल जाधव, पाणलोटचे सचिव सुभाष जाधव, शाखाप्रमुख विशाल बोऱ्हाडे, संघटक संतोष पंचरास, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे, प्रतिक जाधव, उपतालुकाप्रमुख महेश वाघ या मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ह. भ. प. संतोष महाराज बढेकर, उपसरपंच संतोष करंजखेले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नितीन जाधव, चेअरमन कोंडिभाऊ तांबे, पोलीस पाटील सुरज जाधव, उपसरपंच मिलिंद शेळके, उपसरपंच दत्तात्रय गवंडी, पोलीस अधिकारी संदीप पवार, उपसरपंच महेश भुमकर, विक्रम बोऱ्हाडे, संचालक सुधाकर जाधव, संचालक दीपक जाधव, मिलिंद जाधव, तान्हाजी रोडे, मच्छिंद्र अमाप, बाळासाहेब जाधव, अमोल जाधव, राहुल जाधव, विकास रोडे, सिलेमान इनामदार, दिलीप बढेकर, किरण जाधव, चिंतामण जाधव, कोतवाल गणपत भंडारकर, सुनिल सासवडे, संजय जाधव, योगेश विधाटे, गोरक्ष हिवरकर, कैलास भुमकर, महंमद तांबोळी, चंकी जाधव दिनेश जाधव, आकाश जाधव, माऊली जाधव, धोंडीभाऊ जाधव आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच सागर जाधव यांनी केले, तर आभार शाखाप्रमुख दीपक जाधव यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ambegaon News : वडगावपीर येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण
Ambegaon News : ‘भीमाशंकर’मार्फत सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप