Ambegaon News : लोणी धामणी : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील दिनकरराव आवटे मित्र मंडळातर्फे देण्यात येणारा भूमिपुत्र पुरस्कार आदर्श ग्राम गावडेवाडी येथील पत्रकार मधुकर गायकवाड यांना जाहीर झाला आहे. मंडळाचे अध्यक्ष याकूबभाई इनामदार यांनी ही माहिती दिली.
महाळुंगे पडवळ येथे मंगळवारी वितरण
जनमित्र (कै.) दिनकरराव आवटे मित्र मंडळाच्या वतीने महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालयात व वि. ग. कापूसकर जुनिअर कॉलेज येथे मंगळवारी (ता. १७) आंबेगाव तालुक्यातील दहावी-बारावीचे गुणवंत विद्यार्थी व आंबेगाव तालुक्यात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना भूमिपुत्र पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, (Ambegaon News) असे मंडळाचे उपाध्यक्ष अजय दिनकरराव आवटे यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मृणालिनी गांजाळे, प्रगतिशील शेतकरी विलास मावकर, उत्कृष्ट सनई वादक दत्ता गायकवाड, माजी नायब तहसीलदार व लेखक सूर्यकांत थोरात, आदर्श उद्योजक अजय भोर, योग प्रशिक्षिका ज्ञानेश्वरी चिखले यांनाही भूमिपुत्र पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
महाळुंगे पडवळच्या सरपंच सुजाता चासकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे व उद्योजक अभय भोर हे उपस्थित राहणार आहेत. (Ambegaon News) मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब गा,र्डी कळंब येथील भक्ती शक्ती गुरु कुलाचे अध्यक्ष बाळासाहेब बोऱ्हाडे, माजी कृषी अधिकारी किशोर चासकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पंचक्रोशीतील व परिसरातील (कै.) दिनकरराव आवटे मित्रमंडळाच्या मित्रमंडळ प्रेमींनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावावी, असे आवाहन उपाध्यक्ष अजय आवटे यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ambegaon News : धामणीत तीन दिवसांपासून जिओ ‘आऊट ऑफ रेंज’
Ambegaon News : विविध उपक्रम राबवत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
Ambegaon News : श्री शिवाजी विद्यालयाचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश