Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उद्या आळंदी ‘बंद’चा नारा; स्थानिक विश्‍वस्त नियुक्तीची मागणी, मोर्चाद्वारे निषेध नोंदवणार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 4 December 2023, 11:08

आळंदी : आळंदी देवस्थानच्या विश्वस्त समितीची निवड करताना ग्रामस्थांना डावलल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. ५) ग्रामस्थांनी बैठक घेऊन आळंदी बंद पुकारला आहे. यादिवशी दळणवळण आणि व्यापार बंद ठेवण्यात येणार आहे. आळंदीतील प्रदक्षिणा मार्गाने निषेध मोर्चा काढून महाद्वार सभेचे आयोजन केले आहे. या बाबतचे निवेदन ग्रामस्थांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांना दिले.

आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रा सोहळा मंगळवारपासून सुरु होत आहे. या दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत विश्वस्त म्हणून स्थानिकांनाही स्थान मिळावे यासाठी आळंदीकर ग्रामस्थांनी बैठक घेऊन मंगळवारी आळंदी बंद पुकारला आहे. आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांची निवड करण्यात यावी यासाठी संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. तरी देखील संबंधित प्रशासनाने स्थानिकांचा विचार न करता आळंदी देवस्थानवर तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशी वर नवीन तीन विश्वस्तांची नेमणूक केली आहे. तत्कालीन विश्वस्तांना देखील मार्च महिन्यापर्यंत मुदत वाढवून दिली आहे. आळंदी ग्रामस्थांच्या वतीने याचा तीव्र निषेध करण्यात आला. प्रशासनाने लक्ष न दिल्यास कार्तिकी वारीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी आळंदी ग्रामस्थांनी दिला आहे.

देवस्थानवर विश्वस्त पदासाठी आळंदीकरांनी अर्ज केले होते. मात्र, मुलाखती झाल्यानंतर एकाही आळंदीकरांची निवड केली नाही. त्यामुळे बंद ठेवण्यात येणार आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडेही दोन आठवड्यांपूर्वी नेमलेल्या तीन विश्‍वस्तांच्या नेमणुकीवर हरकत घेतल्याचे निवेदन रवींद्र पाटील यांना दिले आहे. विश्वस्त मंडळात स्थानिक ग्रामस्थांनाही स्थान देण्यात यावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यासंबंधी ग्रामस्थांकडून प्रशासनाला पत्रव्यव्हार देखील केला होता, मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशीनुसार आणखी नव्या तिघांना विश्वस्त मंडळात स्थान दिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. संबंधित मागणीसाठी ग्रामस्थांनी एकमत करून उद्या आळंदी बंद पुकारला आहे.

 

मागण्या मान्य न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. प्रशासन स्थानिकांच्या मागणीची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

सख्खा भाऊ पक्का वैरी! भावाच्या ऑफिसच्या शेजारी स्वतःचं ऑफिस सुरु केल्याने जीवघेणा हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.