बारामती : बारामती विधानसभा निवडणुकीबाबत अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार आगामी विधानसभा निवडणूक बारामतीमधून लढवणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळवा पार पडणार आहे. या मेळाव्यात अजित पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बारामती सोडणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर अजित पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना त्यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.