बारामती : पालकमंत्री कधी होणार, असे अनेकांना प्रश्न पडले आहेत. माझ्यासाठी आज सुवर्णक्षण आहे. बारामतीमधील लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले आहेत. अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं देवेंद्र फडणवीस `बोलले आहेत. त्यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
अमोल मिटकरी यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. बारामतीत अजित पवार यांचा नागरी सत्कार समारंभ कार्यक्रम होत आहे. यावेळी आमदार अमोल मिटकरी बोलत होते.
पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, आम्ही कोणाचा तिरस्कार करणार नाही. अजित दादांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आणि यश मिळालं. अनेक लोक अजितदादांना भेटून गेले. अजित पवार हे भगवान शंकरासारखे आहेत. सगळ्यांना समजून घेतात. ते पहाटे उठून कामाला लागतात.
जितेंद्र आव्हाड हे रात्री दोन वाजता झोपतात. आणि दुपारी दोन वाजता उठतात. ते झोपेत ट्विट करतात. अजितदादांवर अनेकदा टीका झाली. त्यांनी सहन केली. त्यांनी २०१९ मध्ये महिलांना अधिक संधी दिली. आताच ब्रह्मादेवाकडे पुढील जन्माची बुकिंग करावं, पुढचा जन्म बारामतीमध्ये व्हावा, असं अमोल मिटकरी म्हणाले.
अजित दादा समोर दिसले की सलाम करतात : अमोल मिटकरी
भाजप, शिवसेनेमध्ये अनेकांना मंत्रिपद दिलं नाही. ते नाराज नाहीत. मग छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिला नाही तर जोडे मारले हे चुकीचे आहे. मागे किती बोला, दादा समोर दिसले की सलाम करतात, असा टोला अमोल मिटकरींनी छगन भुजबळ यांना लगावला. तसेच परभणी आणि बीडच्या घटनेवरही अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं.
अजित पवार यांनी दिलेला शब्द खरा केला आहे. अनेक निवडणुकीत तो खरा केला. परभणीत घटना घडली. त्यावर अजित पवारांनी शब्द दिला आहे. बीडच्या मस्साजोगमधील कुटुंबाला सांत्वनपर भेट घेतली. त्यांनाही आधार दिला, असंही अमोल मिटकरी यावेळी म्हणाले.