पुणे : पवार कुटुंबीयांची दिवाळी दरवर्षी बारामतीमधील गोविंद बागेत उत्साहात पार पडत असतो. मात्र यावर्षी अजित पवार यांनी बंड करून भाजप आणि शिंदे गट यांच्यासोबत गेले. दरम्यान, अजित पवार गोविंद बागेत येणार का नाही? याची चर्चा चांगलीच रंगली होती. पण आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच दिवाळी पाडवा पार पडला. आज दिवसभर कार्यक्रम झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियात फोटो पोस्ट केले होते.(Ajit pawar)
मात्र, त्या पोस्टमध्ये अजित पवार दिसले नव्हते. पण,त्यांनी संध्याकाळी अकराच्या सुमारास इन्स्टावर केलेल्या पोस्टमध्ये अजित पवार थेट शरद पवार यांच्या पाठीमागे दिसून आले. त्यामुळे अजित पवार गोविंदबागेत पवारांच्या दिवाळीत सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.(Sharad Pawar)
राज्यभरातून शरद पवार यांचे समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच राजकीय नेत्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत गर्दी केली होती . सकाळपासूनच गोविंद बागेबाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांची भेट घेत शुभेच्छांचा स्वीकार करत होते. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीमधील फुटीनंतर यंदाच्या गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार का? याबाबतची उत्सुकता सर्वानाच होती. मात्र उशिरा का होईना अजित पवार यांनी बारामतीतील गोविंद बागेत हजेरी लावली. (Supriya Sule)