Ajit Pawar News : पुणे : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घटना-घडामोडी घडत आहेत. यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया देत कायदेशीर बाजू सांगितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या अजित पवार गटाचा दावा आहे की, त्यांच्याकडे विधीमंडळात बहुमत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की, खरा पक्ष वेगळा आणि विधीमंडळ पक्ष वेगळा. त्यामुळे खरा पक्ष शरद पवारांकडे आहे आणि विधीमंडळ पक्ष अर्थात अजित पवारांकडे आहे.(Ajit Pawar News)
घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया देत कायदेशीर बाजू सांगितली.
अजित पवारांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाकडे जात थेट राष्ट्रवादी पक्षाचं अध्यक्षपद, पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह सगळ्यावरच दावा केला. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीवर हक्क कुणाचा, हा वाद आयोगाकडे गेल्याने पुढे काय होणार याविषयी चर्चा सुरू आहेत. त्यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया देत कायदेशीर बाजू सांगितली आहे.(Ajit Pawar News)
अजित पवारांनी आपणच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा करण्याला अर्थ नाही, असेही बापट यांनी स्पष्ट केले. आज शरद पवारांच्या पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे आहे. खरा पक्ष अजून शरद पवारांकडेच आहे. जे निवडून आलेले लोक असतात ते पक्षाच्या बळावर निवडून येतात. त्यामुळे विधीमंडळ पक्ष खरा पक्ष होऊ शकत नाही, असं मत उल्हास बापट यांनी व्यक्त केलं. आता कुठला पक्ष खरा हा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागेल, असेही बापट म्हणाले.(Ajit Pawar News)
एखादा आमदार ज्या विचारधारेचा आहे, त्यावरून जनता त्याला मतदान करत असते. पक्ष सोडून दुसरीकडे गेला, तर स्वतःची आई सोडून तिकडे गेल्यासारखं आहे. तुम्ही नाळ तोडू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे बाहेर गेले तो विचार करण्याचा एक मुद्दा आहे. परंतु तिथं बहुमत आहे म्हणून तो पक्ष त्यांचा असा दावा अजित पवारांना करता येऊ शकत नाही.
अजित पवारांनी पक्षावर दावा केला आहे. राष्ट्रीय अध्यक्षपद स्वतःकडे रहावे, यासाठी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. परंतु पक्षचिन्हावर दावा करता येणार नाही. त्यांना प्रथम निवडणूक आयोगाकडे जावे लागेल. तिथं आयोग कुठला पक्ष खरा यावर निर्णय घेई. त्यानंतर मग पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाकडे हे ठरेल, असेही उल्हास बापट यांनी नमूद केले.(Ajit Pawar News)