डोर्लेवाडी, (बारामती) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेडोपाड्यात तळागाळात केलेला विकास यामुळे ग्रामीण भागातील चेहरा मोहरा बदलला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा केलेला वाढदिवस या कामाची पावती आहे, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले आहे. डोर्लेवाडी ग्रामपंचायत व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या संयुक्त विद्यमानाने अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संभाजी होळकर बोलत होते.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शाळांना खाऊ वाटप करण्यात आले. दिलीप चौधरी मित्र परिवार यांच्यावतीने केक कापण्यात आला. तर छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक रमेशराव मोरे यांच्या वतीने विध्यार्थ्यांना दीड हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी गावच्या सरपंच सुप्रिया नाळे, पंचायत समिती माजी सभापती अशोक नवले, उपसरपंच विश्वजित घोडे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत जाधव, बापूराव निलाखे, सुनिल म्हेत्रे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस सरचिटणीस अविनाश काळकुटे, सामाजिक कार्यकर्ते श्रीजित मोरे, सहेली फाउंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी आटोळे खरेदी विक्री संघाचे माजी संचालक भगवान क्षीरसागर, माजी सरपंच पांडुरंग सलवदे, अॅड.अतुल भोपळे, कांतीलाल नाळे, उत्तम नवले, ग्रामविकास अधिकारी रामचंद्र कारंडे, व आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना होळकर म्हणाले, “येथिल न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय जागा इमारतीचा अनेक वर्षापासून असणार प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने लवकरच मार्गी लावण्यात येईल व नवीन इमारत बांधकाम करण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली.
दरम्यान, हरित डोर्लेवाडीसाठी सामाजिक कार्यकर्ते बापूराव गवळी, कांतीलाल काळकुटे यांच्याकडून पेरू व आंबा 100 झाडांचे वाटप करण्यात आले. तसेच न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडी येथिल गरीब व होतकरू काही विध्यार्थी बारामती तालुका दुध संघाचे संचालक श्रीपती जाधव व विनोद नवले यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतली. तसेच वैदुवस्ती अंगणवाडी येथील चिमुरड्यांना ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, शाम शिंदे यांनी खाऊ वाटप केले.