बारामती: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सध्या राजकीय घडामोडीही जोरदार सुरु आहेत. त्यात संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत.
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. सध्या गणपती उत्सव साजरा केला जात आहे. बारामती शहरातील अखिल भारतीय तांदुळवाडी वेस या गणपती मंडळाने अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तसेच बॅनरवर तुमच्यासाठी कायपण, माणूस जिवाभावाचा… असा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीत बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे.
गेल्या अनेक दिवसापासून बारामतीतील कार्य कर्त्यांची इच्छा आहे की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. या आधी देखील अनेक वेळा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री आशा आशयाचे फ्लेक्स लागले होते.