पुणे Ajit Pawar : राज्याचा अर्थमंत्री असताना आमदारांचा निधी हा एक कोटी रुपयांवरून टप्याटप्याने पाच कोटी रुपये केला होता. (Ajit Pawar) यंदा हा निधी सात कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा मनोदय होता. (Ajit Pawar) मात्र, सत्ता गेल्यामुळे हे काम करता आले नाही. असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. (Ajit Pawar)
राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नव्हते. असा आरोप शिंदे गटातील आमदरांनी केला होता. त्यामुळे राज्यात चांगलीच चर्चा रंगली होती. सभागृहात देखील यासंदर्भाने बोलले गेले. मात्र आता अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या वक्तव्यामुळे आमदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Ajit Pawar)
बारामती येथील प्रशासकीय भवनात ध्वजवंदन
महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथील प्रशासकीय भवनात पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
अर्थमंत्री असताना आमदारांचा निधी वाढविण्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार टप्प्याटप्याने निधी वाढविण्यात आला. एक कोटी रुपयांवरून हा निधी पाच कोटी रुपयांपर्यंत केला. यंदा हा निधी सात कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा विचार होता. मात्र, दरम्यानच्या काळात सत्ता गेली. त्यामुळे हे काम होऊ शकले नाही. सत्ता टिकली असती, तर आमदारांचा निधी सात कोटी रुपये केला असता. असे यावेळी पवारांनी सांगितले.
प्रत्येक गोष्टीसाठी या पुढील काळात शासकीय निधीवर अवलंबून राहून चालणार नाही. आता लोकसहभाग वाढविणे गरजेचे झाले आहे. त्यानुसार बारामतीतील विविध सेवाभावी संस्थांनी शहरातील प्रत्येक भागाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यातूनच विकास साधला जाऊ शकतो. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ajit Pawar : गौतमी पाटीलने बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो…. अजित पवार म्हणाले…
Ajit Pawar : वेल्ह्याचे नामकरण राजगड करण्याची अजित पवार यांची शिंदे-फडणवीसांकडे मागणी..