Ajit Pawar बारामती (पुणे) : बागेमध्ये मुलं मुली बसतात. त्यावेळी एखादा कोणी वेडा वाकडा वागला तर त्याची गय करणार नाही. बारामतीधील वातावरण बिघडवण्याचा कोणी प्रयत्न केला अगर कायदा व सुव्यवस्थेला ठेच लावली, त्याची गय केली जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक आई बापाने आपल्या मुलाला समजावून सांगावे असा सज्जड दमच विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीकरांना दिला आहे.
बारामतीतील आप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उद्घाटन..!
विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी (ता. १८) बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीतील आप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झाले त्यावेळी अजित पवार बोलत होते.
पवार म्हणाले, बारामती मध्ये कोणालाही असुरक्षित वाटणार नाही याची काळजी मला घ्यावी लागेल आणि त्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना आखाव्या लागतील त्यामुळे कोणत्याही टुकार पोराला अशा घटना घडल्या तर सोडणार नाही. राज्यातील तालुक्याच्या ठिकाणी केएफसीचे पहिले आउटलेट खुले करण्यात आले. ते बारामतीत सुरू झालं आहे. त्यामुळे बारामतीत सगळ्यांना सुरक्षित वाटले पाहिजे असेही अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, “आजचा वेळ मी कुटुंबासाठी दिला आहे. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. माझा भाऊ ६० वर्षात पदार्पण करतो आहे. त्याचे केस पांढरे आणि माझे केस काळे आहेत. हा रंगाचा परिणाम आहे. “पण जेव्हा आम्ही सत्तेत असतो तेव्हा कामात राजकारणात आणत नाही. त्यामुळे सत्ता नसताना आपली कामे अडत नाहीत. असेही पवार म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Ajit Pawar | दूध भेसळीच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक!
Ajit Pawar | सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले, म्हणाले