पुणे : कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशीचे लग्न पार पडते. तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त सुरू होतात. हिंदू धर्मात लग्नासारख्या शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहणे महत्त्वाचे मानले जाते. हिंदू रितीरिवाजानुसार मंगल दिवस आणि मुहूर्तावर शुभकार्य केल्याने वैवाहिक जीवन उत्तम जाते, असे मानतात. यंदा तुमच्या घरात लगीनघाई सुरू असेल तर २०२३ च्या शेवटच्या महिन्यात लग्नासाठी काही मोजकेच शुभ मुहूर्त शिल्लक आहेत.
कोणतेही कार्य किंवा शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहिला जातो. शुभ दिवसांमध्ये विवाह केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते, असे म्हटले जाते. लग्नाचा दिवस हा शुभ काळ, जन्माच्या वेळी नक्षत्र आणि चंद्राची स्थिती यासह अनेक गोष्टी लक्षात घेऊन ठरवला जातो. यंदा हे शुभ मुहूर्त नेमके कोणते आहेत, पाहुया…
यंदा कर्तव्य असल्यास, या तारखा पहा…
जर तुम्ही देखील यंदा लग्नाचा विचार करत असाल तर २३ नोव्हेंबर, २४ नोव्हेंबर, २५ नोव्हेंबर, २७ नोव्हेंबर, २८ नोव्हेंबर आणि २९ नोव्हेंबरला लग्नाचा दिवस निश्चित करू शकता. तसेच डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यात ४ डिसेंबर, ५ डिसेंबर, ६ डिसेंबर, ७ डिसेंबर, ८ डिसेंबर, ९ डिसेंबर, १४ डिसेंबर, १५ डिसेंबर, १७ डिसेंबर, २० डिसेंबर, २१ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर हे लग्नासाठी शुभ मुहूर्त ठरत आहेत.
जानेवारी महिन्यातील मुहूर्त
जानेवारी २०२४ मध्ये ३ जानेवारी, ४ जानेवारी, ५ जानेवारी, ६ जानेवारी, ८ जानेवारी, १७ जानेवारी, २२ जानेवारी, २७ जानेवारी, २८ जानेवारी आणि ३० जानेवारी.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असलेला देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आता लग्नसराईसाठी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जाईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.