उरुळी कांचन, (पुणे) Uruli Kanchan : पंचवीस वर्षे मनात साठवून ठेवलेल्या शालेय जीवनातील आठवणींना मनसोक्त गप्पांच्या माध्यमातून मोकळी वाट करून देण्याचा प्रयत्न उरुळी कांचन (ता. हवेली) (Uruli Kanchan) येथील तत्कालीन दहावीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. याला निमित्त होते होते ते स्नेहसंमेलनाचे. (Uruli Kanchan)
उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
“अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती” या उक्तीप्रमाणे आपल्या शालेय जीवनाला उजाळा देण्यासाठी १९९८ मध्ये दहावीचे शिक्षण घेतलेल्या उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात स्नेहसंमेलन पार पडले. या वेळी गुरूजनांप्रती आदरभावना व्यक्त करीत त्यांचे पूजन करून प्रार्थना घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले उपस्थित होते.
सुमारे २५ वर्षांनंतर एकत्र येण्याने जुन्या मित्र मैत्रिणींना एकमेकांना भेटताना आनंदाश्रू अनावर झाले होते. १९९८-९९ वर्षीच्या इयत्ता १० वी मधील माजी विद्यार्थी – विद्यार्थीनींच्या सहभागाने हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. ह्या स्नेह मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या बॅचचे विद्यार्थी डॉ. समीर ननावरे यांच्या माध्यमातून डॉ. केतन पाटील, डॉ. कल्पेश वाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ माजी विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांना मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती – हनुमान प्रतिमेचे पूजन केल्यानंतर दिपप्रज्वलन करुन प्रार्थना घेण्यात आली नंतर स्वागत गीत संपन्न केल्यावर २५ वर्षांच्या प्रदीर्घ काळात दिवंगत झालेल्या शिक्षक, कर्मचारी, माजी विद्यार्थी यांच्यासह अनेक समाज बांधवांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांची ओळख, पाहुण्याचा सन्मान, काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासंदर्भात असणाऱ्या भावना व्यक्त केल्या. शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. चार महिन्यापासून माजी विद्यार्थी मधून कोरकमिटी स्थापन करण्यात आली होती त्यांचे उत्तम प्रकारे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी उपप्राचार्य किसन कोकाटे, माजी प्राचार्य देविदास टिळेकर, बबनराव दिवेकर, सय्यद सर, टी. जी. कोचेटा, गं. गो. जाधव, माजी शिक्षक एच. के. गायकवाड, दत्तात्रय तळेकर, शिरीष तोडकरी, पुष्पलता लोंढे, सोनवणे सर, के. टी. गायकवाड, रत्नप्रभा भोर, पुष्पा गायकवाड, सुजाता गायकवाड, प्रज्ञा परदेशी, अरुणा हेंद्रे, वैराट सर, निर्मळे सर, बागडे सर, चौधरी सर, काशिद सर, बडगुजर मॅडम, कुलकर्णी मॅडम, साळुंखे मॅडम, विद्यमान शिक्षक राजेंद्र बोधे, संगीता कुंभार, सेवक व माजी विद्यार्थी – विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश चौधरी यांनी केले. अतिशय खेळामेळात कार्यक्रम पार पडला.