लोणी काळभोर : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यपदी अॅड. अनिता सूर्यकांत गवळी यांची निवड करण्यात आली. डॉ. गवळी या यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत. त्यांची ही निवड जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली आहे.
राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे माजी अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. अनिता गवळी या यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत आहेत. त्यामुळे त्यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे कामकाज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असते. या परिषदेत शहर पोलीस, जिल्हा परिषद, ग्रामीण पोलीस, अन्न व औषध प्रशासन, वैधमापन विभाग, दूरसंचार विभाग, वीज वितरण कंपनी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यासह शासकीय विभागांबरोबरच ग्राहक संघटना यांचे अशासकीय प्रतिनिधी सदस्य असतात.
ग्राहकांच्या समस्या सोडणार
या निवडतीनंतर अॅड. अनिता गवळी म्हणाल्या, “या परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्या, अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. ग्राहक कायद्याबद्दल जनजागृती, प्रचार व प्रसिद्धी करुन ग्रामीण भागातील ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणार आहे”.