उरुळी कांचन, (पुणे) : ‘मी माझी’ या संकल्पनेच्या आधारे महिलांनी स्वतःवर प्रेम करावे. स्वतःसाठी वेळ काढावा. स्वतःच्या जीवनाची राणी बनावे. स्वतःबरोबर इतरांवरही प्रेम करावे, असे ॲड. अश्विनी जगताप यांनी सांगितले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून जगताप बोलत होत्या. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत होते. यावेळी उपप्राचार्य अविनाश बोरकर, प्रा. डॉ. समीर आबनावे, डॉ. अमोल बोत्रे, प्रा. विजय कानकाटे, अनुप्रिता भोर, अंजली शिंदे, शुभांगी रानवडे, वैशाली चौधरी, प्रतीक्षा कोद्रे, प्रणिता फडके, दीपाली चौधरी, सुजाता गायकवाड, प्रा. प्रदीप राजपूत, विशालदिप महाडिक उपस्थित होते.
यावेळी अवंती जाधव या विद्यार्थिनीने ‘मी सिंधुताई सपकाळ बोलतेय’ या विषयावर सादरीकरण केले. वैष्णवी चव्हाण या विद्यार्थिनीने स्त्री विषयक विचार व्यक्त केले. प्रतीक्षा मूल्या या विद्यार्थिनीने स्त्री सन्मान विषयक कविता सादर केली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अर्चना कुदळे यांनी केले. तर आभार सारिका ढोणगे यांनी मानले.
लोकमंगल पतसंस्थेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
दरम्यान, उरुळी कांचन येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित महिलांना डॉ. माधवी बोरावले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये उद्योजिका अक्षदा कांचन, विजया भोसले, रेल्वे पोलीस रुपाली कदम, आदर्श प्रायमारी शाळेच्या संस्थापक व अध्यक्ष नीलम कोंडे, दीपा लोखंडे – आशा गटप्रवर्तक दीपा लोंखडे आदींना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी बोडके व शुभांगी परीट यांनी केले. स्वागत सोनाली मुळे यांनी तर आभार परिघा कांचन यांनी मानले. यावेळी संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.