पुणे : पुणे शहरातील प्रत्येक कोयता विक्री खरेदी करणाऱ्याला आत्ता आधार कार्ड द्यावे लागणार आहे, अशी नोटीस पुणे पोलिसांकडून पाठवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच घटनांमध्ये कोयताच्या वापर दिसून येत.
त्यामुळे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार सध्या शहरात जी कोयत्याची दुकाने आहे. त्या दुकानावर कोयता विक्री करण्यापूर्वी ज्याला कोयता घ्यायचा आहे त्या व्यक्तीला आपला आधारकार्ड द्यावे लागणार आहे. यात कोणी विकत कोयता घेतला याची माहिती पोलिसांना असणार आहे. कारण मोठ्या प्रमाणावर शहरात असलेल्या गुन्ह्यात कोयत्याचा वापर दिसून येत आहे. आता पुणे पोलिसांच्या वतीने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
कोयता विक्रेत्यांना नोटीस…
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत माजवली आहे. यावर कडक पाऊल म्हणून पुणे पोलिसांच्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यात अनेक गुन्हेगारांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. आता पुढचे पाऊल म्हणून पुणे पोलिसांच्या वतीने शहरातील कोयता विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्येक कोयता विक्री खरेदी करणाऱ्याला आत्ता आधार कार्ड द्यावे लागणार आहे.