पुणे : फिर्यादी सारिका( नाव बदलेले आहे) या महिलेचे लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच त्यांना पतीकडून मारहान होत होती. सासू, नणंद, दीर यांच्यामार्फत सतत अपमान, मानसिक त्रास देणे चालू होते. त्यामुळे सतत होणारी मारहाण, पोटभर खायला न देणे, माहेरून पैसे आणि सोने आणण्यासाठी तगादा लावणे, घालून पाडून शिवीगाळ करणे, सतत अपमाणित करणे अशा स्वरूपाचे कौटुंबिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची तक्रार फिर्यादीमार्फत दिघी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती.
त्यानुसार R. C. C 147/2019 महाराष्ट्र सरकार वी सुनील रामचंद्र चंदनशिवे, कमल चंदनशिवे, प्रशांत चंदनशिवे यांच्यावर फिर्यादी यांनी भा. द. वि कलम 498(A), 323, 504, 34 अन्वये गंभीर शिक्षेस पात्र असलेले आरोप केले होते.
ॲड. श्याम कांबळे, ॲड. राधिका भिसे यांनी आरोपीतर्फे युक्तिवाद केला. वकिलांनी आरोपीवर केलेले आरोप खोडून काढले. फिर्यादीतर्फे केलेले आरोप तक्रारदार यांना सिद्ध करता आले नाही. त्यासंदर्भात असलेले पुरावे बचाव पक्षातर्फे खोडून काढण्यात आले. सदरचा युक्तिवाद ऐकून घेऊन में. न्यायालयाने सदर अरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपीतर्फे ॲड. श्याम कांबळे, ॲड. राधिका भिसे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.