पुणे : पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीची सबळ पुरावा न मिळाल्याने निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायधीश ए. एन. मरे यांच्या कोर्टाने दिले आहेत. अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली. नामदेव शिंदे असे असे निर्दोष मुक्त झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नामदेव शिंदे व मयत पत्नी सिंधू शिंदे हे 2 वर्षाच्या मुलीसह पुण्यातील कासारवाडी परिसरात राहत होता. 18 मे 2019 रोजी रात्री आरोपी आणि पत्नी जेवण करून झोपले होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी पाणी पिण्या करीता उठला असता पत्नी सिंधू हिने ओढणीच्या साह्याने फाशी घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर आरोपीने डॉक्टरांना बोलावले व विळी च्या साहाय्याने फास कापून पत्नीस खाली उतरून घेतेले.
रुग्णालयात दाखल केले असता पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार सिंधूला पुढील उपचारासाठी वाय.सी.एम. रुग्नालायात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले. त्याच्या दुसऱ्या दिवशी सिंधूच्या वडिलांनी फ्लॅट घेण्यासाठी 25 लाखांची मागणी करीत असल्याची तक्रार आरोपी पती याच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात दिली. तसेच आरोपी पती याला दारूचे व्यसन असल्याने मुलीस त्रास दिल्याने मुलीने आत्महत्या केली. त्यानुसार आरोपी नामदेव याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. सदर केस कामी सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले.
मयताचे शवविच्छेदन अहवालात सिंधूने फाशी घेण्यापूर्वी विष प्राशन केल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले होते. या कारणामुळे या प्रकरणाला गांभीर्य प्राप्त झाले होते. आरोपी तर्फे जेष्ठ विधिज्ञ अॅड. सुधीर शाह आणि अॅड. नितीन भालेराव यांनी काम पहिले. आरोपी यांनी कुठलाही गुन्हा केलेला नसून नामदेव याने कधीही मयत व तिच्या घरच्यांकडे कधीही पैसे मागितले नाहीत तसेच पोलिसांनी मयताचे नातेवाईकांच्या व्यतिरिक्त इतर साक्षीदार तपासले नाहीत.
दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या शवतपासणी अहवाल आणि न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालात विसंगती असल्याबाबतचा युक्तिवाद आरोपी अॅड. सुधीर शाह यांनी केला. आरोपी पक्ष व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायधीश ए. एन. मरे. यांच्या कोर्टाने आरोपीस त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा न मिळाल्याने निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. या कामी अॅड. मयूर चौधरी, अॅड शुभम पालवे, अॅड. अन्वी भोसले यांनी मदत केली.