पुणे : पुण्यातील मंगळवार पेठ येथे दुचाकी चोरणार्या आरोपीकडून दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने एक दुचाकी हस्तगत केली आहे. साहिल सागर शेलार (वय-२०, रा. टकलेवाडी, पानशेत रोड, गोर्हे खुर्द, ता. हवेली) असे या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. पुढील कारवाई करण्यासाठी आरोपीला सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दुचाकी चोरी झालेल्या गाड्यांचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार महेश पाटील यांना बातमीदारांकडून बातमी मिळाली की, एक जण पुण्यातील मंगळवार पेठेत चोरीच्या गाडीसह थांबलेला आहे. या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे वाहन चोरी विरोधी पथक गुप्ता प्लॉटच्या समोर गेले.
दरम्यान, तेथे थांबलेल्या आरोपी साहिल याला पकडले. त्याच्याकडील दुचाकीची चौकशी केल्यानंतर त्याने ती चोरीची आहे. अशी कबुली दिली. सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, गणेश ढगे, अजित शिंदे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, रवींद्र लोखंडे, महेश पाटील, श्रीकांत दगडे, अमित गद्रे, अक्षय गायकवाड, नारायण बनकर यांनी केली आहे.