पुणे : Pune Crime News : शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या (Shivaji Nagar court premises) आवारातून २० फूट उंचीवरून (height of 20 feet ) उडी मारून (jumping) पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या (Accused tried to escape) आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. (Pune Crime News)
पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव
दिपक शिवाजी जाधव (वय-२८, रा. कात्रज) असे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सचिन शिंदे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक जाधव याच्यावर न्यायालयाने वॉरंट काढले होते. आरोपी वॉरंट रद्द करण्यासाठी न्यायालयात आला होता. न्यायालयाने आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
आरोपीच्या विरोधात न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच, आरोपी जाधवने न्यायालयीन कक्षातून पळ काढला आणि वीस फूट उंचीवरून उडी मारली. त्यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जाधवला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी जाधवची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.