पुणे, ता. 01 : बायकोच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची तब्बल 26 वर्षांनी निर्दोष मुक्तता झाली आहे. पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या कोर्टाने हे निर्देश दिले आहेत. अंकुश पुतळा जाधव (रा. बहुली ता. हवेली) असे निर्दोष मुक्त झालेल्या आरोपीचे नाव आहे. अशी माहिती ॲड. नितीन भालेराव यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर 1999 साली आरोपी अंकुश आणि त्याच्या बायकोच्या मध्ये बहुली गावाच्या जवळील जंगलात गावदऱ्याच्या इथे चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात दगड घालून खून केला होता. सदरची घटना गावातील महिलेने पहिल्याने तिने गावातील पोलीस पाटील यांना कळवल्याने अरोपि विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. खून करून आरोपी फरार झाला होता त्यानंतर आरोपीच्या गैरहजेरीत पोलिसांनी आरोपीविरुद्ध तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
सन 2020 मध्ये करोना काळात लॉकडाऊन मध्ये हवेली पोलिसांनी आरोपी अंकुश जाधव यास अटक केली व त्यास न्यायालयासमोर हजर केले होते. त्यानंतर आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. आरोपी फरार असताना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पुणे यांच्या कोर्टाने आरोपीच्या गैरहजेरीत 5 साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले होते. आरोपीच्या अटकेनंतर 4 असे एकूण 9 साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले.
दरम्यान, आरोपी कारागृहात असताना आरोपीने न्यायालयास वकील मिळण्यास मदत मागितल्याने न्यायालयाच्या कायदेशीर मदत केंद्रामार्फत आरोपीची केस चालवण्यासाठी अॅड. नितीन भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोपीने कुठलाही गुन्हा केलेला नसून आरोपी कधीच बहुली गावात राहण्यास नव्हता तसेच आरोपीस कुठल्याही साक्षीदाराने ओळखले नाही. असा युक्तीवाद आरोपी तर्फे करण्यात आला.
आरोपी पक्ष व पक्षाचा युक्तीवाद ऐकून पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुखे यांच्या कोर्टाने आरोपी विरुद्ध पुरावा नसल्याने आरोपीस पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली.