संतोष गायकवाड
पुणे : पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी आणि वाहनचोरी या गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी तीव्र मोहिम राबवून कारवाई करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हडपसर पोलिसांना आदेश दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून हडपसर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. हंजराज ऊर्फ हंसु रणजितसिंग टाक (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत गाडीतळ, हडपसर) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दरम्यान, अमलदार नितिन मुंडे यांना आरोपी हंसराज रणजितसिंग टाक हा हडपसरमधील कॅनॉल रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखा युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यानंतर प्राथमिक तपासात त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
१३ डिसेंबर रोजी अटक करून हंजराजला कोर्टात हजार केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली. आरोपीकडून १११ ग्रॅम सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीवर विविध पोलीस स्टेशन मध्ये एकुण ९ गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. आधिक तपास रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके हे करत आहेत.
ही कामगिरी रितेशकुमार, पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, अपरपोलीस आयुक्त, अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त, सतिश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, नितीन धाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.