पुणे: यंदा सर्वच सण सरासरी पंधरा दिवस आधी येणार असून गणपती बाप्पाचे आगमन ऑगस्टमध्येच होणार आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असे समीकरण ठरलेले असते. अधिक महिना असल्यास हे सण एक महिना पुढे जातात. यंदा मात्र चित्र बदलले आहे.
परंपरेप्रमाणे १४ जानेवारीला मकरसंक्रांत झाल्यानंतर मार्चच्या अखेरीस येणारी होळी यंदा पहिल्या पंधरवडयातच आहे. गुढीपाडवा मार्चमध्येच साजरा होणार आहे. श्रावण महिन्यापासून सणांना प्रारंभ होतो. हा महिना जुलैअखेरीस सुरू होणार आहे. नागपंचमी २९ जुलैला, तर रक्षाबंधन ९ ऑगस्टला असणार आहे.
जन्माष्टमी १५ ऑगस्टला साजरी होणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व जून या महिन्यांमध्ये दोन सण आले आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये चार आणि नोव्हेंबरमध्ये तीन सण आले आहेत. यावर्षी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेला मोहरम व आषाढी एकादशी एकाच दिवशी म्हणजे ६ जुलैला येणार आहेत. मुस्लिम समाजाचा ईद सण गणेशोत्सवादरम्यानच साजरा होणार आहे. ५ सप्टेंबरला ईद व ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. हिंदू नवीन वर्ष गुढीपाडवा आणि रमजान ईद लागोपाठ असून, ३० मार्चला गुढीपाडवा आहे. यासह ३१ मार्चला रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे.
२०२५ नवीन वर्षातील महत्वाचे सण
सणमकरसंक्रांत मंगळवार १४ जानेवारी, महाशिवरात्री बुधवार २६ फेब्रुवारी, होळी गुरुवार १३ मार्च, रंगपंचमी बुधवार १९ मार्च, गुढीपाडवा रविवार ३० मार्च, आषाढी एकादशी रविवार ६ जुलै, नागपंचमी मंगळवार २९ जुलै, रक्षाबंधन शनिवार ९ ऑगस्ट, श्रीकृष्ण जन्माष्टमी शुक्रवार १५ ऑगस्ट, श्री गणेश चतुर्थी गणेश आगमन बुधवार २७ ऑगस्ट, गणेश विसर्जन मंगळवार ६ सप्टेंबर, घटस्थापना सोमवार २२ सप्टेंबर, दसरा गुरुवार २ ऑक्टोबर, नरक चतुर्दशी दीपावली सोमवार २० ऑक्टोबर, लक्ष्मीपूजन मंगळवार २९ ऑक्टोबर, पाडवा बुधवार २२ ऑक्टोबर, भाऊबीज गुरुवार २३ ऑक्टोबर, दत्त जयंती गुरुवार, ४ डिसेंबर.