Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक! लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या 24 तासात न्यायालयामध्ये दाखल केले दोषारोपत्र

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 20 March 2025, 14:20

लोणी काळभोर, ता. 20 : विवाहानंतरही आपले जुने प्रेमसंबंध चालू राहू दे, असे म्हणून महिलेची छेडछाड, प्रेमसंबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना घडली होती. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात सोमवारी (ता.17) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्याआत अटक करून गुन्ह्याचे दोषारोपत्र 24 तासाच्या आत न्यायालयात दाखल केले आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एवढ्या त्वरित कारवाई केल्यामुळे लोणी काळभोर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अजय दिलीप भोसले (वय-32, रा. ड्रिम्स निवारा सोसायटी, कोरेगांव मुळ ता. हवेली जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 31 वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित असून त्या लोणी काळभोर परिसरात कुटुंबासोबत राहतात. फिर्यादी व आरोपी अजय भोसले यांची फिर्यादी यांच्या विवाहाच्या आगोदरपासून ओळख होती. फिर्यादी व आरोपी यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले होते. काही वर्षापूर्वी फिर्यादी यांचा विवाह झाल्याने त्यांनी आरोपी अजय भोसले याच्यासोबतचे सर्व नाते तोडले होते.

दरम्यान, आरोपी अजय भोसले फिर्यादी यांच्या घरासमोर एकेदिवशी आला. आरोपीने फिर्यादी यांचा हात हातामध्ये घेतला आणि म्हणाला “तु मला सोडुन जावु नकोस, मी तुझ्या शिवाय जगु शकत नाही, आपले प्रेमसंबंध चालु राहू दे” असे म्हणून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी यांनी आरोपी भोसले यास तु जे करीत आहेस ते चुकीचे आहे. असे समजावुन सांगत होत्या. फिर्यादीचे आरोपीने काहीही ऐकुन न घेतल्याने फिर्यादी यांनी आरोपीचा हात झटकुन त्याला धक्का दिला. धक्का दिल्याचा राग मनात धरून फिर्यादी यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली.

याआगोदारही आरोपी अजय भोसले याने फिर्यादी यांचे प्रेमसंबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तसेच फिर्यादी या कामानिमित्त घराबाहेर जात असताना, आरोपीने फिर्यादीचा पाठलाग केला. अशी तक्रार महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आरोपी अजय भोसले याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74,78,115 (2),352,351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीला अटक, 24 तासाच्या आत न्यायालयात दोषारोपत्र दाखल

पोलीस दलातील सिंघम व शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या वारंवार होणाऱ्या कारवायांमुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले असून अवैध धंदेचालकांनी या सिंघम पोलीस अधिकाऱ्याचा धसका घेतला आहे. एकीकडे राजेंद्र पन्हाळे हे अवैध धंदेचालक व गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. तर दुसरीकडे गोरगरीब व पिडीतांसाठी धावून जाऊन न्याय देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. वरील गुन्ह्यात पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत आरोपीला अटक करून न्यायालयात 24 तास होण्यापूर्वीच दोषारोपत्र दाखल केले आहे. त्यांच्या वरील कामगिरीमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे हे कर्तव्यनिष्ठ व तप्तर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास चर्चेत! महत्त्वाचे CCTV फुटेज देण्यास मुंबई पोलिसांची नकारघंटा..

Tuesday, 17 November 2026, 17:05

रोहित पवारांचं ‘मफलरवाला नेता’ विधान; सुप्रिया सुळेंनी डायरेक्ट हात जोडले, म्हणाल्या “रोहितचं मन अस्वस्थ आहे…

Tuesday, 17 November 2026, 16:55

जंक फूडला टांग; आरोग्यासाठी सायकलची ‘पांग’!पुणे ते शिर्डी 180 किलोमीटरचा प्रवास; सायकलस्वारांनी दिला सकस आहाराचा संदेश

Tuesday, 17 November 2026, 16:19

वाळू माफियांना शिरूर अन् श्रीगोंदा महसूल विभागाचा जोरदार दणका! आठ सेक्शन अन् नऊ फायबर बोटी जिलेटिनने फोडल्या; घोड धरणातील अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई!

Tuesday, 17 November 2026, 16:07

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ४ धडाकेबाज निर्णय! नक्षलवाद्यांनी लुटलेल्या शस्त्रांची माहिती द्या अन् मिळवा रोख बक्षीस

Tuesday, 17 November 2026, 15:50

पुण्यात साखरपुड्यासाठी आले, हॉटेलबाहेर गाडी पार्क केली अन् नंतर घडला विचित्र प्रकार; चोरट्यांनी संधी साधत…

Tuesday, 17 November 2026, 14:57
Next Post

Big Breaking : लोणी काळभोरचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके निलंबित ; थेऊर गोळीबार प्रकरणात आरोपीस मदत केल्याचा ठपका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp