Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : लोणी काळभोरचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके निलंबित ; थेऊर गोळीबार प्रकरणात आरोपीस मदत केल्याचा ठपका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 20 March 2025, 14:29

लोणी काळभोर (पुणे): एका महिलेच्या डोक्यात दगड मारून, तसेच पतीवर पिस्तुलातून गोळीबार करून पसार झालेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेल्या गुन्हेगारास स्थानिक पोलिसाने मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासात पोलिसानेच गुन्हेगारास अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचे समोर आल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कर्तव्यास असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी काढला आहे.

थेऊर येथील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी मुख्य आरोपी भरत जैद याला अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे. ज्यावेळी हा गुन्हा घडला, त्यावेळी जैद घटनास्थळी हजर नव्हता, असे साक्षीदार सुदर्शन यशवंत आगळने व प्रतिक रमेश बिटे जबाब तपास टिपणांमध्ये नमुद करुन ती तपास टिपणे गुन्ह्याच्या कागदपत्रांत समाविष्ठ केली. परंतु, लोणी काळभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या तपासादरम्यान आरोपी भरत जैद हा घटना घडली, त्यावेळी घटनास्थळी हजर असल्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक घोडके यांनी बारामती येथील तिरुपती हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून भरत जैद हा बारामतीवरून पुण्याच्या दिशेने येताना त्याच्या इतर ७ साथीदारांसोबत काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीमध्ये आला नाही. तर, तो सुदर्शन आगळमे यांच्यासोबत त्यांच्याकडील शेवोरलेट गाडीमध्ये बसून आला होता. त्यानंतर जैद हा थेऊर मार्गे न जाता हडपसर, विश्रांतवाडी मार्गे गेला होता, असे निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तपासादरम्यान भरत जैद हा गुन्ह्यात जप्त केलेल्या काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीमध्ये बसूनच सुपा पोलीस ठाणे येथून त्याच्या इतर सात साथीदार यांच्यासह निघाला होता.

त्यानंतर मोशी येथे थेऊर, केसनंद मार्गेच गेल्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत. यावरुन पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी आरोपीस आप्रत्यक्षरित्या मदत केल्याचे निष्पन्न होत असल्याचे निलंबन आदेशात नमूद केले आहे. घोडके यांना निलंबन कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी करता येणार नाही. तसेच घोडके यांना दररोज शिवाजीनगर येथील पुणे पोलीस मुख्यालय राखीव पोलीस निरीक्षक यांच्याकडे हजेरीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर ; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp