लोणी काळभोर, (पुणे) : घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन बंगला फोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व इतर साहीत्य चोरी करून फरार असलेल्या आरोपीला २४ तासात लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई घोरपडे वस्ती चौकात करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रेमबहादुर दोदी दौमाई (वय-४३, रा. घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली जि.पुणे, मुळ रा.लमकी चुवा, जि.कौलाली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मासुन परवेज अब्दुलमतीन (वय-४५, रा. शांतीकिरण सोसायटी, बंगला नं ०६, इनामदार वस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मासुन परवेज अब्दुलमतीन हे शांतीकिरण सोसायटी बंगला नं ०६ इनामदार वस्ती लोणीकाळभोर येथे राहण्यास आहेत. ते त्यांच्या मूळ गावी आसाम येथे गेले होते. त्यावेळी चोरट्यानी घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन बंगल्याची खिडकी तोडुन बंगल्यात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुम मधील लाकडी कपाटाचे लॉक तोडुन कपाटातील सोन्याचे दागिने व इतर साहीत्य असे मिळून तब्बल १ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
याप्रकरणी परवेज यांनी लोणीकाळभोर पोलीस फिर्याद दिली होती. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके व तपास पथकातील पोलीस अंमलदार बाजीराव वीर, पोलीस हवालदार रामहारी वनवे, पोलीस हवालदार विलास शिंदे, पोलीस अंमलदार सुरज कुभांर यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार बाजीराव वीर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ३५ ते ४० वयोगटाचा नेपाळी दिसणारा व्यक्ती घोरपडे वस्ती येथे महागडा मोबाईल विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घोरपडे वस्ती चौकात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान, लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात आणुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून सोन्याचे दागीने व इतर साहीत्य असे मिळून १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगीरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त आर राजा, सहा. पोलीस आयुक्त अश्विनी राख, , लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदशनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पो. अ. बाजीराव वीर, पो. हवा. रामहारी वनवे, पो. हवा. विलास शिंदे, पो. अं. सुरज कुभांर, पो.हवा. संभाजी देवीकर, पो. हवा. गणेश सातपुते, पो. अं. शैलेश कुदळे, पो. अं. योगेश शिरगीरे, पो. अ.प्रदीप गाडे, पो. ना. सुनिल नागलोत यांच्या पथकाने केली आहे.