Accident On Expressway : पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे गेल्या दहा दिवसांच्या काळात विविध कारणांमुळे तब्बल सहा वेळा बंद राहिला. या मार्गावरुन मोठा टोल भरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे हा द्रुतगती महामार्ग आहे, की कासवगती मार्ग आहे, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. काल (ता. ) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बोरघाट पोलीस चौकीजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातमधील एक ट्रक काचेची वाहतूक करत होता. अपघातानंतर या काचा रस्त्यावर पसरल्या. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. यावेळी वाहतूक पुन्हा जुन्या महामार्गावर वळवण्यात आली होती. त्यामुळे खंडाळा घाटात मुंबई मार्गिका बंद करण्यात आली होती.
दहा दिवसांत तब्बल सहा वेळा मार्ग बंद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एक्स्प्रेस वेची पाहणी करून दरड प्रवण क्षेत्रात जाळ्या लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एक्स्प्रेस वे वरील वाहतूक बंद करुन जाळ्या बसवण्याचे काम करण्यात आले. तरीही मागील दहा दिवसांत तब्बल सहा वेळा या महामार्गावरील लेन बंद राहिली.
दरम्यान, या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. २४ जुलै रोजी प्रथम येथे दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. (Accident On Expressway ) त्यानंतर २५ जुलै रोजी दोन तासांचा ब्लॉक घेऊन दरड हटवण्याचे काम सुरु केले. त्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी मेगा ब्लॉक घेतला गेला. कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली होती. त्यावेळी पुन्हा वाहतूक ठप्प झाली होती. ही दरड हटवण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला.
दरडी कोसळण्याच्या घटनांनंतर आता एक्स्प्रेस वे वर बोरघाट पोलीस चौकीजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. (Accident On Expressway ) यावेळी वाहतूक पुन्हा जुन्या महामार्गावर वळवण्यात आली होती. आज या महामार्गावरील वाहतूक सुरुळीत सुरु झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ‘माझ्याकडे बॉम्ब आहे’ पुणे विमानतळावरील महिलेचा दावा; सुरक्षा यंत्रणेचे धाबे दणाणले!