पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने महिलेवर शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा येथील पीडितेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद असून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. रोहित संजय कदम (२९, रा. कामोठे, नवी मुंबई) असं गुन्हा दाखल झालेल्याच नाव आहे. हा प्रकार मांजरी, मुंढवा येथे ऑगस्ट २०२३ ते ३ जानेवारी २०२४ यादरम्यान घडला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एका ऑनलाइन विवाह नाेदणीच्या संकेतस्थळावरून दाेघांची ओळख झाली. फिर्यादी युवतीने एका विवाह विषयक संकेतस्थळावर नाव नोंदविले होते. त्यातून रोहित कदम याच्याशी त्यांची ओळख झाली. कदम याने त्यांच्या मुंढव्यातील घरी घेऊन त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गोरे करत आहेत.