लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे लवकरच रुपडे पालटणार असून, त्यासाठी शासनाने 5 कोटी 87 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. लोणी काळभोर आणि परिसराची वाढती लोकसंख्या पाहता लोणी काळभोर पोलीस ठाण्याला अद्ययावत आणि सुसज्ज इमारतींची आवश्यकता होती. त्यामुळे लवकरच लोणी काळभोर पोलीस ठाण्याची वास्तू नव्या दिमाखात उभी राहील.
मागील २५ वर्षापूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यात आली आहे. या परिसरात औद्योगिक वसाहतीमुळे प्रचंड प्रमाणात विस्तार झालेला आहे. या पोलीस ठाण्याची इमारत जुनाट झाल्याने नवीन अद्ययावत आणि सुसज्ज अशी इमारत बांधण्यात यावी म्हणून शासकीय पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरु होते.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा विस्तार मोठा आहे, मात्र त्या ठिकाणी अपुरी जागा पडत होती. त्यामुळे या पोलीस ठाण्याचे मोठी इमारत बांधकाम होणे आवश्यक होते. यासाठी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी वतीने नवीन इमारतीच्या बांधण्यात यावे. यासाठी समितीकडे मागणी केली होती. या मागणीला आज अखेर यश आले आहे.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णयान्वये सुधारित कार्यपणानुसार जिल्हाधिकारी यांनी सन 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग पुणे यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याची नवी वास्तू बांधण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्या अनुषंगाने शासनाकडून तब्बल ५ कोटी 87 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. तसेच या बधाकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे. सुसज्ज इमारत उभारण्याची नागरिकांची मागणी पूर्ण होणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे लोणी काळभोर पोलिस ठाण्याची इमारत बांधण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून ५ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याला येणाऱ्या नागरिकांना सुविधांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे मी अजितदादांचे आभार मानतो.
दिलीप वाल्हेकर (सदस्य – जिल्हा नियोजन समिती, पुणे)