लोणी काळभोर, (पुणे) : जेष्ठ कामगार नेते दिवंगत सोपानराव हाडके यांच्या मार्गदर्शनानुसार अभिनव चेतना पतसंस्था काम करत आहे. समाजाचे आपण काही देणं लागतो या भावनेतून पतसंस्था वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवत असून आगामी काळात ही समाजाला फायदेशीर ठरतील असे नाविन्यपूर्ण उपक्रम पतसंस्थेच्या वतीने राबवण्यात येतील अशी ग्वाही पतसंस्थेचे उपाध्यक्ष हेमंत हाडके यांनी दिली.
अभिनव चेतना पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ कामगार नेते स्वर्गीय सोपानराव हाडके यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त मोफत नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप, होमीओपॅथी मोफत उपचारांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी हेमंत हाडके बोलत होते. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काळभोर, संचालक पांडुरंग काळभोर, झानेश्वर कुंभार, मुकुंद काळभोर, सचिन काळभोर, विठ्ठल लांडगे, शामराव शेवाळे, जयेश हाडके, स्वाती हाडके, अशोक भोसले, कृष्णा पवार, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष काळभोर, सचिव डेंगळे, साधना बँकेचे अध्यक्ष सुभाष नरसिंग काळभोर, डॉ अनिल काळे, डॉ वंदना मिटकर आदी उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष काळभोर यांनी संस्थेचे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरू असल्याबद्दल कौतुक केले. यावेळी ज्ञानेश्वर कुंभार, पांडुरंग काळभोर, डाॅ वंदना मिटकर आदींनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार सचिन काळभोर यांनी मानले.