उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील बाजीराव उर्फ आबा अर्जुनराव शितोळे (वय-46) यांचे गुरुवारी (ता. 25) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे लाईन परिसरात बाजूला थांबले असता सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रेल्वेचा धक्का बसला होता. या घटनेत ते जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कोरेगाव मूळचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप शितोळे यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात वडील, एक भाऊ, पत्नी, दोन मुले, असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर इनामदारवस्ती येथील राहत्या घराच्या पाठीमागे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.