Aashadhi Wari शिरूर : पुंडलिक वर दे… हरि विठ्ठल… श्री ज्ञानदेव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय…असा एकच जयघोष झाला. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम या अंभगावर तल्लीन झालेल्या विद्यार्थ्यांसमोर प्रवचन सादर करण्यात आले. (Aashadhi Wari) त्यातून माऊली…माऊली च्या जयघोष करत रांजणगाव गणपती ( ता. शिरूर ) येथील महागणपती ग्रुप ऑफ स्कूल मध्ये जनजागृती करत निघालेल्या दिंडीत पारंपारिक वेषातील अवतरलेले संत , वारकरी यांना विद्यार्थी व पालकांनी याची देही याची डोळा अनुभवले. (Aashadhi Wari)
विद्यार्थ्यांकडून अभंग, फुगडी, लेझीम, झांज असे पारंपारिक कलांचे सादरीकरण
रांजणगाव (ता. शिरूर) येथील महागणपती ग्रुप ऑफ स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त जनजागृती दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम, संत नामदेव आदी संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थी हे या दिंडी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते. यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग, फुगडी, लेझीम, झांज असे पारंपारिक कलांचे सादरीकरण केले. सृष्टी गायकवाड या विद्यार्थिनीने प्रवचन केले.
ज्ञानेश्वर माऊली…ज्ञानराज माऊली तुकाराम… या जयघोषात शाळेचा परिसर दुमदुमला गेला होता. दिंडीमध्ये झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिक वापर टाळा, पाणी जपून वापरा, मुलगी वाचवा मुलगी शिकवा आशा आशयाचे जनजागृती करणारे फलक ही समाविष्ट होते.
दरम्यान, संस्कृती जतन करण्यासाठी राज्यातून भावीक पंढरपुर येथील विठ्ठल रूखमिणीच्या दर्शनास पायी दिंडी सोहळ्यात जात असतात. या वारकरी सांप्रदायाची संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रूजली पाहिजे. व्यसनाच्या आहारी जाणारा तरूण पहाता पालकांनी विद्यार्थ्यांना वारकरी सांप्रदायाचे महत्व पटवून देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. यासाठीच विद्यालयात दिंडी सोहळा, भजन, प्रवचन असे वेगवेगळे सोहळे घेतले जात असतात. असे संस्थापक अध्यक्ष डॅा. विकास शेळके यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य अरविंद गोळे, सचीव प्रकाश शेळके पर्यवेक्षक श्री निलेश फापाळे, महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल उपप्राचार्य अबेदा आत्तार, अक्षरनंदन गुरुकुल स्कूल प्राचार्य वंदना खेडकर, महागणपती ग्लोबल स्कूल एच ओ डी सोनाली नलावडे, प्राचार्य पद्मिनी कवठेकर, आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या दिंडीचे संपूर्ण आयोजन मच्छिंद्र खैरनार तसेच सर्व शिक्षक यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता जाधव व कांचन खेडकर यांनी केले. प्रियांका जोरी मॅडम यांनी दिंडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.