Pune News : पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज डेअरीचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर (दौंड) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. (Pune News) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या सूचनेनुसार त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. (Pune News)

पक्षाच्या सूचनेनुसार दिला राजीनामा
संचालक मंडळाच्या मंगळवारी (दि.27) झालेल्या बैठकीपूर्वी त्यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती.(Pune News) त्यानुसार अध्यक्ष बदलानंतर आता जिल्हा दूध संघात उपाध्यक्षपद कोणत्या तालुक्याकडे जाणार, याकडे दूध उत्पादक संस्था आणि शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.

गारटकर यांनी अन्य संचालकांना उपाध्यक्षपदी संधी देण्यासाठी पक्षाच्या निर्णयानुसार दिवेकर यांना राजीनामा देण्याची सूचना केली असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. (Pune News) तर पक्षाच्या सूचनेनुसार व वैयक्तिक कारणामुळे मी जिल्हा दूध संघात राजीनामा दिल्याची माहिती उपाध्यक्ष राहुल दिवेकर यांनी दिली. त्यामुळे उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अपेक्षित असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Pune News : एसटी बस चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने ८० प्रवास्यांचे वाचले प्राण ; पुणे नाशिक महामार्गावर एसटीचेस्टे रिंग फेल
Pune News : जगातील सातही आश्चर्ये आता पहा पुण्यात, तेही एकाच ठिकाणी… आहे ना आश्चर्य?







