जीवन शेंडकर
Aashadhi Vari : उरुळी कांचन, (पुणे) : दौंड तालुका प्रामुख्याने शेतीवर आवलंबून असल्याने दिवसेंदिवस शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभिर होऊ लागला आहे. दौंड तालुक्याला मुबलक पाणी मिळावे म्हणून पुढील काळात मुळशीचे पाणी मिळवून पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवणार असल्याचे प्रतिपादन भाजप बारामती मतदारसंघ प्रमुख तथा दौंडचे आमदार अँड. राहुल कुल यांनी केले आहे. Aashadhi Vari
प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या डाळिंब बन (ता. दौंड) येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिवसभरात दौंड, हवेली आणि पुरंदर तीन तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या श्री विठ्ठलाची आषाढी एकादशीची महापूजा राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कुल यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी टाळम्रदुंगाच्या गजर आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम व विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झालेल्या वारकर्यांच्या भक्ती रसाचा महापूर यानिमित्ताने डाळिंब बन येथे लोटला होता. (Aashadhi Vari)
यावेळी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, डाळींबचे सरपंच बजरंग म्हस्के, डॉ. मणिभाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, किर्ती कांचन, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, डाळिंबचे माजी सरपंच राजेंद्र तावरे, संदिप ताम्हाणे, सागर म्हस्के, नंदकुमार म्हस्के, माऊली कांचन, देवस्थानचे सर्व सदस्य आदी पदाधिकारी, हजारो भाविक उपस्थित होते. (Aashadhi Vari)
यापुढे बोलताना कुल म्हणाले, “दौंड तालुक्याचे अनेक प्रश्न सोडवले आहेत, काही राहिले आहेत, तेही लवकरच सोडवले जातील, रस्ते, वीज, आरोग्य आदी कोणतीही समस्या असू द्या, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवेन, जनतेचे प्रश्न सुटावेत अशी प्रार्थना पांडुरंगाकडे केली आहे.
माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, ” पाऊस लांबला आहे, अन्यही प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न सुटावेत, भरपूर पाऊस पडावा,बळी राजा सुखी व्हावा, अशी प्रार्थना श्रीविठ्ठल चरणी करतो. (Aashadhi Vari)
पहाटेपासूनच दिवसभर दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. डोळे मिटता सामोरे, पंढरपूर हे साक्षात मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर, आषाढी- कार्तिकी विसरू नका, मज सांगतसे गुज पांडुरंगा, विठ्ठल आवडी प्रेमभाव, जय जय विठोबा-रखुमाई अशा सुरेल अभंगांच्या निनादाने हलक्या स्वरुपात दिवसभर संततधार सुरु असतांना रात्रीपर्यंत भक्तांच्या गर्दीचा महापूर होता.
दरम्यान, परिसरातील लाखो भाविकांनी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत विठ्ठल मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्तविक देवस्थानचे व डॉ. मणिभाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी केले. सूत्रसंचालन एल. बी. म्हस्के यांनी तर आभार तानाजी म्हस्के यांनी मानले.