युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या सन २००५ ते २००६ बॅचच्या तब्बल १०० विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहमेळाव्या आयोजन केले. प्रत्येक्षात समजात वावरणारे डॅाक्टर, पोलिसअधिकारी, वकील, उच्च अधिकारी, पत्रकार, उद्योजक, उत्तम गृहिणी हे माझे विद्यार्थी १९ वर्षानंतर एकत्र पाहिल्यावर भारावून गेल्याची प्रतिक्रिया प्राचार्य आर. बी. गावडे यांनी दिली. त्यावेळी ते बोलत होते . सर्व माजी विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबात सनईच्या सुरात ताशाच्या वाद्यावर शाळेच्या परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.
माजी विद्यार्थ्यांनी मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांचा गौरव केला. माजी विद्यार्थ्यांतर्फे विद्यालयास पर्यावरण दिनानिमित्त रोपे भेट देण्यात आले. प्राचार्य गावडे म्हणाले की, १९ वर्षानंतर एकत्रीत शिक्षण घेतलेले विद्यार्थी शिक्षकांसमवेत भेटल्याचा आनंद आगळा वेगळा आहे. माझी शाळा आणि आजची शाळा यामध्ये बदल झालेला जाणवत असेल. गुणवान विद्यार्थ्यांमुळे तालुक्यात शाळेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. हा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी शाळेच्या भैतीक सुविधांमध्ये सहभाग घेऊन अजरामर राहणारी विद्यार्थी उपयोगी वास्तू शाळेला भेट द्यावी. सर्वांनी एकत्रित येऊन सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा. यावेळी शिक्षक महेंद्र गायकवाड,ज्ञानदेव गावडे,नवनाथ राऊत यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
यावेळी शुभांगी साळवे, पंढरीनाथ ऊचाळे, सुवर्णा देवकर, राहुल चोरे, संदीप चोरे, मंगल सराफ, गणेश गावडे, अनिल रसाळ, प्रदीप किठे,गोरक्ष घोडे, राकेश साळवे, छाया सोदक, प्रश्नांत शितोळे, रुपाली कोल्हे,मयूर कांदळकर,दत्तात्रय गावडे, सुनिता गावडे,सारिका सोदक, प्रश्नांत शिंदे, संदीप घोडे, राजश्री औटी, आशा औटी, दादाभाऊ घोडे, रुपाली आटोळे, साधना रसाळ, रुपाली गाडगे, रुपाली कांदळकर, अजित चोरे, अनिल जाधव, हैदरअली हवालदार या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या बॅचचे माजी विद्यार्थी हे पोलिस उपनिरीक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, बँक, पोलिस, कपडे वस्त्रोद्योग, पत्रकार, मेडिकल, कंपनीत उच्च अधिकारी, उत्तम गृहिणी, स्वव्यवसाय, अशा वेगवेगळ्या ठिकाणी पारंगत आहेत. कार्यक्रमाचे आयोजन पोलिस उपनिरीक्षक विद्या साळवे, विजय थोरात, अरुण सोदक, प्रश्नांत रसाळ,गणेश टाव्हरे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय कांदळकर यांनी केले.सुत्रसंचालन लहू साबळे यांनी तर आभार रघुनाथ कांदळकर यांनी मानले.
२०१६ पासून सोशल मीडियावर “आमची शाळा” नावाने ग्रुपची स्थापना करण्यात आला होता. खूप वेळा सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला परंतु अनेक वेळा काहीना काही अडचणीमुळे व्यत्यय येत होता. परंतु सर्वांच्या सहकार्याने १९ वर्षानंतर आम्ही सर्वजण एकत्रित भेटलो. जुन्या मित्र मैत्रिणींना भेटल्याने एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. इथून पुढे सातत्याने स्नेहमेळावा आयोजित करण्यात येईल.
सौ.विद्या प्रताप साळवे (पोलिस उपनिरीक्षक – छत्रपती संभाजीनगर)