पुणे : पुणेकरांना नव्या वर्षात पीएमपीएमएलकडून खास गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. डबल डेकर बस मुंबईनंतर आता पुण्यात देखील धावण्याची शक्यता आहे. पीएमपीएलची नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी ही माहिती दिली आहे.
बकोरिया म्हणाले, मुंबईमध्ये डबल डेकर बस धावत आहेत, याचे कारण म्हणजे तिथल्या पायाभूत सुविधा पुण्यापेक्षा वेगळ्या आहेत. मात्र पुणेकरांनाही ही बस आवडण्याची शक्यता आहे, आम्ही मुंबईमधील बेस्टशी यासंदर्भात चर्चा करणार आहोत.
तसेच या बसेस पुण्यासह, पिंपरी चिंचवडमध्ये किती यशस्वी होतील यासाठी एक अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतर याबद्दल ठोस निर्णय घेतला जाईल, असंही बकोरिया यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईप्रमाणे पुण्यात देखील “डबल डेकर बस येणार असल्याची शक्यता आहे.