पुणे : भारतीय निवडणूक आयोगाने दि. १५ ऑक्टोबर रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूका कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांस व त्यांच्या कार्यालयास दि. २० नोव्हेंबर रोजी मतदानानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांस व त्यांच्या कार्यालयास मतदानानिमित्त २० नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत एक परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांसह त्यांच्या कार्यालयास मतदानानिमित्त स्थानिक सुट्टी मिळणार आहे.