Daund News दौंड, (पुणे) : कुसेगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेळीचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना मंगळवारी (ता. ९) पहाटे उघडकीस आली आहे. शेतकऱ्यांने आरडाओरडा केल्याने बिबट्याने पोबारा केला. मात्र या घटनेने परिसरात भीतीचे वातारवण पसरले आहे.
शेळीचा जागीच मृत्यू..
मिळालेल्या माहितीनुसार, कुसेगाव येथे योगेश काटे यांच्या शेतात शेळ्या-मेंढ्यांचे वाडगे आहे. मंगळवारी पहाटे मेंढ्या-शेळ्या ओरडल्याचा आवाज आला. त्यावेळी काटे यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यावेळी बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याचे दिसून आले. त्यांनी जखमी शेळीकडे घाव घेतली. मात्र, शेळीचा जागीच मृत्यू झाला होता.
दरम्यान, आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. यावेळी काही जणांनी वनविभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल शीतल खेंडके, वनकर्मचारी अरुण मदने यांनी घटनास्थळी घाव घेतली. परिसराची पाहणी केली. यावेळी एका प्राण्याचे ठसे आढळून आले. वनाधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Daund Crime : दौंडमधील गोहत्या करणाऱ्या टोळीवर तडीपारीची कारवाई