उरुळी कांचन, (पुणे) : दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका दुचाकी चालकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यवतवरुन शिंदवणे बाजूकडे जात असताना उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकात गुरुवारी (ता. 06) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली आहे.
प्रकाश महादेव यादव (वय-35, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई शरद भानुदास चव्हाण, (वय 45), यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन पोलीस गस्त घालीत असताना पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रकाश महादेव यादव हे (एम.एच.12,यु.टी 3695) हे आपल्या दुचाकीवरून यवत बाजूकडून शिंदवणेकडे दुचाकीवर निघाले होते. त्यांच्या जवळ असलेली दुचाकी गाडी हि वेडीवाकडी चालवीत असताना आढळून आले.
दरम्यान, त्यांना थांबवून गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने त्यांची तपासणी केली. त्यात त्यांनी दारू पिल्याचे आढळून आले. याबाबत पोलीस कर्मचारी शरद चव्हाण यांनी फिर्याद दिल्याने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार महिला पोलीस हवालदार मनीषा कुतवळ करीत आहे.