उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोड परिसरात उडवलेला फटाका चुकवताना झालेल्या अपघातप्रकरणी एक अल्पवयीनसह तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिक संतोष साठे, (वय-21, रा. भवरापूर, ता. हवेली (मृत व्यक्तीचे नाव), व संतनाथ बाळासाहेब आलमे, रा. दत्तवाडी, बगाडेमळा, उरूळी कांचन, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार उध्दव मारुती गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 02 नोव्हेंबर) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन हद्दीतील मुरकुटे यांच्या बिल्डींगजवळ व निसर्गाोपोचार केंद्राजवळ प्रतिक साठे हा पुणे सोलापूर हायवेच्या बाजूकडून रेल्वे पुलाच्या बाजूकडे आश्रमरोडने निघाला होता. यावेळी हयगयीने अविचाराने व रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून व भरधाव वेगात गाडी चालवून समोरून आलेल्या बुलेटला धडक देऊन अपघात केला.
या अपघातात स्वत: चे व इतर तीन जणांचे किरकोळ व गंभीर दुखापतीस व स्वत:च्या मृत्यूस व दोन्ही दुचाकींच्या नुकसानीस कारणीभूत ठरला आहे. म्हणून प्रतिक साठे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच क्षितीज जाधव याने त्याच्या ताब्यातील बुलेट ही रेल्वेपुलाच्या बाजूकडून पुणे-सोलापूर हायवेच्या बाजूकडे आश्रम रोडने चालवित घेऊन निघाला होता.
यावेळी बुलेट हयगयीने अविचाराने व रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून व भरधाव वेगात व स्वत:कडे दुचाकी चालविण्याचा परवाना नसताना व स्वत: अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील चालवून समोरून आलेली ओला गाडीस धडक दिली. या अपघातात स्वत:चे व इतर तीन जणांचे किरकोळ व गंभीर दुखापतीस व प्रतिक साठे याच्या मृत्यूस व दोन्ही नुकसानीस कारणीभूत झाल्याप्रकरणी क्षितीज जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, संतनाथ बाळासाहेब आलमे याने त्यांचे ए-एस. हेअर्स स्टुडिओ नावाचे सलूनचे दुकानाच्या ओपनींगच्या कार्यक्रमावेळी लोकांच्या जिवीतास धोका उत्पन्न होईल व रहदारीस अडथळा होईल, अशा रितीने सार्वजनिक रहदारीचे व वर्दळीच्या रोडवरच स्फोटक फटाके व फटाके वाजवीत असतानाच त्याचवेळी सदर ठिकाणी दोन दुचाकींचा अपघात झाला. याप्रकरणी संतनाथ बाळासाहेब आलमे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मटाले करीत आहे.